Ad will apear here
Next
डॉ. आ. ह. साळुंखे करणार मुस्लिम साहित्य संमेलनाचे उद्घाटन
चार ते सहा जानेवारीदरम्यान पुण्यात आयोजन
पुणे : ‘मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळ आणि  महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी यांच्या वतीने मुस्लिम मराठी साहित्य चळवळीचे १२ वे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन चार ते सहा जानेवारी २०१९ या कालावधीत दरम्यान पुणे येथे होणार आहे. संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे  यांच्या हस्ते चार जानेवारीला सकाळी १० वाजता आझम कॅम्पस येथे होईल,’ अशी माहिती स्वागताध्यक्ष आणि सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांनी दिली.

अधिक माहिती देताना ते म्हणाले, ‘उद्घाटन सोहळ्याला पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, डॉ. विश्वनाथ कराड, निवृत्त व्हाइस अॅडमिरल निजाम नदाफ, डॉ. जहीर काझी, प्रा. फ. म. शहाजिंदे, विलास सोनावणे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. प्रा. डॉ. अलीम वकील हे या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असून, संमेलन स्थळाला प्रा. फक्रुद्दीन बेन्नूर साहित्यनगरी असे नाव देण्यात आले आहे. आझम कॅम्पस येथे मुस्लीम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शेख इकबाल मिन्ने यांच्या अध्यक्षतेखाली संयोजन समितीने पूर्ण तयारी केली आहे.’

महाराष्ट्रातील मुस्लिमांची बोलीभाषा दखनी असली, तरी त्यांची व्यवहाराची आणि अभिव्यक्त होण्याची भाषा मराठी आहे. मुस्लिम मराठी साहित्य चळवळ ही महाराष्ट्रातील मुस्लिमांनी मराठीत अभिव्यक्त होण्यासाठी २८ वर्षांपासून प्रयत्न करीत आहे. २३ वर्षांनी पुण्यात हे साहित्य संमेलन  पुन्हा होण्याचा योग्य जुळून आला असून, या चळवळीची साहित्य संमेलने या आधी  सोलापूर, नागपूर, रत्नागिरी, नाशिक, जळगाव, कोल्हापूर, औरंगाबाद, पनवेल, नवी मुंबई, मुंबई, पुणे येथे झाली आहेत.

चार जानेवारीला दुपारी २.३० वाजता ‘महाराष्ट्रातील बोलीभाषा आणि मुस्लीम मराठी साहित्य’ या विषयावर परिसंवाद होईल. त्यात डॉ. मुहम्मद आझम, डॉ. आनंद काटीकर, डॉ. प्रतिमा इंगोले, गुलाम ताहेर शेख, डॉ. रज्जाक कासार आदी सहभागी होतील. सायंकाळी ४.३० वाजता ‘राष्ट्रवाद कोणाची मिरासदारी’ या विषयावर परिसंवाद होईल. त्यात डॉ. कुमार सप्तर्षी, डॉ. अब्दुल कादर  मुकादम, प्रा. जावेद कुरेशी, प्रा. रहमतुल्ला कादरी, डॉ.  भालचंद्र कांगो, श्रीमंत कोकाटे, साहिल शेख सहभागी होतील. रात्री आठ ‘म्यूट’ ही एकांकिका सादर होईल. नऊ वाजता कवी संमेलन होणार असून, त्यात प्रा. फ. म. शहाजिंदे, सय्यद अल्लाउद्दीन, डॉ. सुभाष माने, डॉ. रफिक सुरज, दुर्गेश सोनार, बादशाह सय्यद, आरती धारप आदी सहभागी होतील.

पाच जानेवारीला सकाळी नऊ ‘सोशल मीडिया आणि नवलेखनाची परंपरा’ यावर परिसंवाद होईल. यात प्रा. फातिमा मुजावर, डॉ. मोईनुद्दीन मुतवल्ली, कलीम अजीज, डॉ. समाधान इंगळे, राम जगताप, हीना कौसर खान, दाहर मुजावर आदी सहभागी होतील. सकाळी ११ वाजता ‘मुस्लीम तरुणांपुढील आव्हाने’ यावर परिसंवाद होईल. यात डॉ. एस. एन. पठाण, गणी आजरेकर, चंद्रशेखर शिखरे, डॉ. फारुख  तांबोळी, हलीमा कुरेशी, अझीम शेख आदी सहभागी होतील. दुपारी १.३० वाजता ‘प्रसारमाध्यमे आणि मुसलमान’ यावर होणाऱ्या परिसंवादात डॉ. जयदेव डोळे, संजय आवटे, आमदार इम्तियाझ जलील, बशीर मुजावर, राज काझी, अझीम शेख, साजिद पठाण आदी सहभागी होतील.   

सायंकाळी चार वाजता ‘धार्मिक ध्रुवीकरण आणि समतेच्या चळवळी’ या विषयावर परिसंवाद होईल. यात डॉ. रत्नाकर महाजन, अन्वर राजन, डॉ. बशरत अहमद, निरंजन टकले, डॉ. सय्यद रफिक पारनेरकर, ह.भ.प. डॉ. सुहास फडतरे महाराज, डॉ. सुदाम राठोड आदी सहभागी होतील. सात वाजता ‘अनुवंशिक गैरसमज’ ही एकांकिका सादर होईल. ७.३० वाजता ‘मुस्लीम यशस्वी उद्योजकांशी संवाद’ हा कार्यक्रम होईल. रात्री नऊ वाजता ‘मिला जुला मुशायरा’ हा कार्यक्रम होईल.

सहा जानेवारीला सकाळी नऊ वाजता कवी संमेलन होईल. सकाळी ११ वाजता ‘मुस्लिम मराठी साहित्याचे सामाजिक योगदान’ या विषयावर होणाऱ्या परिसंवादात फ. म. शहाजिंदे, डॉ. विद्या बोरसे, डॉ. विश्वास वसेकर, डॉ. अक्रम पठाण, डॉ. पांडुरंग कंद आदी सहभागी होतील. दुपारी दीड वाजता मुस्लीम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळाची सर्वसाधारण सभा होणार असून, खुले संमेलन होईल. दुपारी २.३० वाजता ‘इस्लाम आणि स्त्रियांचे हक्क’ हा परिसंवाद होईल. यात डॉ. कादिरा शेख, आबेदा इनामदार, डॉ. आयेशा पठाण, सीमा देशपांडे, शरीफा बाले सहभागी होतील. सायंकाळी ४.३० वाजता संमेलनाचा समारोप होणार असून, या वेळी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे उपस्थित राहणार आहेत.

संमेलन यशस्वी करण्यासाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली असून, त्यात डॉ. शेख इकबाल मिन्ने, प्रा. लियाकत अली पटेल, अन्वर जावेद शेख, डॉ. बशरत अहमद, प्रा. आरिफ शेख, युनुस आलम सिद्दीकी, साजिद पठाण, ए. के. शेख, विलास सोनावणे, इम्तियाझ शेख, महमूद काझी, अब्दुल अझीम शेख, बशीर मिन्ने, कलीम अझीझ, दहार मुजावर, डॉ. केतकी भोसले, अब्दुल लतीफ मगदूम, नूरजहाँ शेख, शहाजहान मगदूम, डॉ. पांडुरंग कंद, कौसर मुजावर, आय. के. शेख यांचा समावेश आहे.

संमेलनाविषयी :
कालावधी :
चार ते सहा जानेवारी २०१९
उद्घाटन : चार जानेवारी २०१९
वेळ : सकाळी १० वाजता
स्थळ : आझम कॅम्पस, पुणे
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SZYDBW
Similar Posts
‘वैराऐवजी स्नेहाचा, सलोख्याचा मार्ग पुढे नेईल’ पुणे : दोन समाज जोडले जाणारे उपक्रम म्हणून हे साहित्य संमेलन आहे. भारतीय समाज संमिश्र स्वरूपाचा आहे. हिंदू-मुस्लीम समाजामध्ये हजार वर्षांचा संपर्क आहे. कटुता, युद्ध, संघर्ष, वादळेदेखील आहेत आणि स्नेह, मैत्री, जिव्हाळाही आहे. भूतकाळातून काय घ्यायचे, भावी पिढ्यांना काय वारसा द्यायचे, हे ठरवणे ही आपली
पुण्यात होणार १२ वे मुस्लिम मराठी साहित्य संमेलन पुणे : मुस्लीम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळातर्फे मुस्लीम मराठी साहित्य चळवळीचे १२ वे अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य संमेलन चार ते सहा जानेवारी २०१९ दरम्यान पुणे येथे होणार असून, संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांची निवड करण्यात आली आहे
‘नव लेखनाचा प्रवास वैचारिक बैठकीकडे व्हावा’ पुणे : ‘प्रतिक्रियात्मक लेखनाकडून वैचारिक बैठकीकडे नव लेखनाचा प्रवास व्हावा,’ असा सूर अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनातील ‘सोशल मीडिया आणि नवलेखनाची परंपरा’ या विषयावर आयोजित परिसंवादात उमटला.
‘एमसीई’तर्फे गांधी जयंतीनिमित्त अभिवादन मिरवणूक पुणे : दीडशेव्या जयंतीनिमित्त महात्मा गांधींना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन (एमसीई) सोसायटीतर्फे गांधी जयंतीच्या पूर्वदिनी म्हणजेच एक ऑक्टोबरला अभिवादन मिरवणुकीचे आयोजन केले होते. यात ‘एमसीई’ सोसायटीतील अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी सहभागी झाले होते

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language